Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संथाली भाषेत भारतीय संविधानाच्या प्रकाशनाबद्दल पंतप्रधानांकडून कौतुक


नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संथाली भाषेत भारतीय संविधानाचे प्रकाशन झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. यामुळे घटनात्मक जागरूकता अधिक दृढ होण्यास तसेच लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढण्यास मदत होईल, असे मोदी यांनी म्हटले आहे. “संथाली संस्कृतीचा आणि संथाली समाजाच्या राष्ट्रीय प्रगतीतील योगदानाचा भारताला अभिमान आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.”

एक्स वर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,

“एक कौतुकास्पद उपक्रम !

संथाली भाषेतील संविधानामुळे घटनात्मक जागरूकता अधिक दृढ होईल आणि लोकशाही सहभाग वाढेल. संथाली संस्कृतीचा तसेच संथाली समाजाच्या राष्ट्रीय प्रगतीतील योगदानाचा भारताला मोठा अभिमान आहे.”
@rashtrapatibhvn

 

“ᱱᱚᱣᱟ ᱫᱚ ᱥᱟᱨᱦᱟᱣᱱᱟ ᱠᱟᱹᱢᱤ ᱠᱟᱱᱟ!

ᱥᱟᱱᱛᱟᱞᱤ ᱯᱟᱹᱨᱥᱤ ᱛᱮ ᱥᱚᱣᱤᱫᱷᱟᱱ ᱨᱮᱭᱟᱜ ᱪᱷᱟᱯᱟ ᱥᱚᱫᱚᱨᱚᱜ ᱫᱚ ᱥᱚᱣᱮᱭᱫᱷᱟᱱᱤᱠ ᱡᱟᱜᱣᱟᱨ ᱟᱨ ᱞᱳᱠᱛᱟᱱᱛᱨᱤᱠ ᱵᱷᱟᱹᱜᱤᱫᱟᱹᱨᱤ ᱮ ᱵᱟᱲᱦᱟᱣᱟ᱾

ᱵᱷᱟᱨᱚᱛ ᱫᱚ ᱥᱟᱱᱛᱟᱞᱤ ᱥᱟᱸᱥᱠᱨᱤᱛᱤ ᱟᱨ ᱡᱟᱹᱛᱤᱭᱟᱹᱨᱤ ᱞᱟᱦᱟᱱᱛᱤ ᱨᱮ ᱥᱟᱱᱛᱟᱞ ᱦᱚᱲᱟᱜ ᱜᱚᱲᱚ ᱛᱮ ᱜᱚᱨᱚᱵᱽ ᱢᱮᱱᱟᱭᱟ᱾”

@rashtrapatibhvn

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai