Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे लोहपुरुष आणि अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले की, सरदार पटेल यांनी एका मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले, जे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नासाठी खूप मोठा  प्रेरणास्रोत आहे.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:

अखंड भारताचे प्रणेते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सादर प्रणाम. त्यांनी एका मजबूत, समृद्ध आणि सक्षम भारताच्या उभारणीसाठी आपले जीवन समर्पित केले. भारतमातेच्या सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी खूप मोठा प्रेरणास्रोत आहे. 

***

शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai