Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

NVS-03 उपग्रह घेऊन जाणाऱ्या GSLV-F18च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल ‘इस्रो’ मधील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NVS-03 उपग्रह घेऊन जाणाऱ्या GSLV-F18च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोमधील भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान म्हणाले की, ही मोहीम भारताची स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली- ‘नाविक’, अधिक बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत क्षमतांनी सज्ज असलेला NVS-03 उपग्रह, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अधिक गती देईल आणि नागरिकांच्या हिताच्या नेव्हिगेशन सेवा अधिक सक्षम करेल.

मोदी यांनी भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या समर्पण आणि कल्पकतेचे कौतुक केले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचा देशाला अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले.

मोदी यांनी ‘X’  वर पोस्ट केले:

NVS-03 उपग्रह घेऊन जाणाऱ्या GSLV-F18 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोमधील आमच्या शास्त्रज्ञांचे आणि अभियंत्यांचे अभिनंदन!

ही मोहीम आपली स्वदेशी उपग्रह नेव्हिगेशन प्रणाली, ‘नाविक’ अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रगत क्षमतांनी सज्ज असलेला NVS-03 उपग्रह, महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या आपल्या प्रयत्नांना अधिक बळ देईल आणि आपल्या नागरिकांसाठी उपयुक्त अशा नेव्हिगेशन सेवांना मदत करेल.

आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांचे समर्पण आणि कल्पकता देशाला सतत अभिमान वाटायला लावणारी आहे.

@isro

***

शिल्पा पोफळे/सुषमा काणे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai