Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीविषयी पंतप्रधानांकडून शोकसंवेदना व्यक्त


उत्तर प्रदेशात वाराणसी आणि चंडोलीदरम्यान असलेल्या राजघाट पुलावर आज झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीविषयी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. या चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत पंतप्रधान कार्यालयानं जाहीर केली आहे. तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

N.Sapre/R.Aghor/P.Kor