Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय पथकाला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2026

 

जपानमध्ये आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 ला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारताला आपल्या पॅरा खेळाडूंचा प्रचंड अभिमान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. या खेळाडूंची जिद्द, समर्पण वृत्ती आणि त्यांच्यातली खचून न जाण्याची भावना 140 कोटी भारतीयांना प्रेरणा देते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळावे अशी सदिच्छा व्यक्त करत, त्यांनी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे.

या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश:

“आयची-नागोया येथे आशियायी पॅरा क्रीडा स्पर्धा 2026 सुरू होत आहे, या स्पर्धेसाठी भारतीय पथकाला माझ्या शुभेच्छा.

आपल्या अद्भुत पॅरा खेळाडूंचा भारताला प्रचंड अभिमान वाटतो. त्यांची जिद्द, समर्पण वृत्ती आणि त्यांच्यातली खचून न जाण्याची भावना 140 कोटी भारतीयांना प्रेरणा देते.

त्यांनी या स्पर्धेत आत्मविश्वासाने खेळावे आणि आपले सर्वोत्तम योगदान द्यावे.”

 

* * *

माधुरी पांगे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai