पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरिवंश यांना राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेवर नामनियुक्त झाल्यानंतर त्यांच्या आगामी संसदीय कार्यकाळासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
हरिवंश यांनी पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले असून, एक सन्माननीय बुद्धीजीवी आणि विचारवंत म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या सखोल विचारांनी आणि अंतर्दृष्टीने गेल्या काही वर्षांत सभागृहाच्या कामकाजात मोलाची भर घातली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी मनापासून आनंद व्यक्त केला आणि हरिवंश यांच्या सभागृहातील पुढे सुरू राहणाऱ्या उपस्थितीमुळे संसदीय चर्चेला अधिक फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
“हरिवंश जी यांनी पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. ते एक सन्माननीय बुद्धीजीवी आणि विचारवंत आहेत. त्यांनी आपले सखोल विचार आणि अंतर्दृष्टीने गेल्या काही वर्षांत सभागृहाच्या कामकाजाला समृद्ध केले आहे. मला अतिशय आनंद होत आहे की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेसाठी नामनियुक्त केले. आगामी संसदीय कार्यकाळासाठी त्यांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा !”
हरिवंश जी ने पत्रकारिता और सार्वजनिक जीवन में अमूल्य योगदान दिया है। वे एक सम्मानित बुद्धिजीवी और विचारक हैं। उन्होंने अपने गहन विचारों और अंतर्दृष्टि से पिछले कुछ वर्षों में सदन की कार्यवाही को समृद्ध किया है। मुझे प्रसन्नता है कि माननीय राष्ट्रपति जी ने उन्हें राज्यसभा के लिए…
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2026
***
निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com