Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेवर नामनियुक्त  झाल्याबद्दल हरिवंश यांना पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज हरिवंश यांना राष्ट्रपतींद्वारे राज्यसभेवर नामनियुक्त  झाल्यानंतर त्यांच्या आगामी संसदीय कार्यकाळासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

हरिवंश यांनी पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले असून, एक सन्माननीय बुद्धीजीवी आणि विचारवंत म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  त्यांच्या सखोल विचारांनी आणि अंतर्दृष्टीने गेल्या काही वर्षांत सभागृहाच्या कामकाजात मोलाची भर घातली आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पंतप्रधानांनी  मनापासून आनंद व्यक्त केला आणि हरिवंश यांच्या सभागृहातील पुढे सुरू राहणाऱ्या उपस्थितीमुळे संसदीय चर्चेला अधिक फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः

“हरिवंश जी यांनी  पत्रकारिता आणि सार्वजनिक जीवन या दोन्ही क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. ते एक सन्माननीय बुद्धीजीवी आणि विचारवंत आहेत. त्यांनी आपले सखोल विचार आणि अंतर्दृष्टीने गेल्या काही वर्षांत सभागृहाच्या कामकाजाला समृद्ध केले आहे. मला अतिशय आनंद होत आहे की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेसाठी नामनियुक्त केले. आगामी संसदीय कार्यकाळासाठी त्यांना माझ्या खूप-खूप शुभेच्छा !”

***

निलिमा चितळे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai