Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

डॉ. सुभाष सी. कश्यप यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (4 जून) लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

डॉ. कश्यप हे भारतातील अग्रगण्य राज्यघटना तज्ज्ञांपैकी एक होते आणि संसदीय तसेच राज्यघटनात्मक विचारविनिमयातील त्यांचे योगदान आपल्या समाजाला समृद्ध करणारे आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. मोदी यांनी सांगितले की, त्यांचे लेखन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याप्रती बांधिलकी विशेष उल्लेखनीय होती. पंतप्रधानांनी त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराचेही सांत्वन केले आहे.

पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्स वरील संदेशात म्हटले आहे,

“लोकसभेचे माजी महासचिव डॉ. सुभाष सी. कश्यप यांच्या निधनाने दुःख झाले. ते भारतातील अग्रगण्य राज्यघटना तज्ज्ञांपैकी एक होते. संसदीय आणि राज्यघटनात्मक विचारविनिमयातील त्यांच्या योगदानामुळे आपला समाज समृद्ध झाला. त्यांचे लेखन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याप्रती बांधिलकी विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराचे सांत्वन. ओम शांती.”

***

NehaKulkarni / ReshamBedekar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai