Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उत्तर प्रदेशातल्या काही भागात वीज कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख


मृतांच्या नातेवाईकाना मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तर प्रदेश मधल्या काही भागात वीज कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करून मृतांच्या नातेवाईकाना मदत जाहीर केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काही भागात वीज कोसळून झालेली जीवित हानी हृदयविदारक आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख सोसण्याचे बळ देवो,असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

उत्तर प्रदेशात वीज कोसळून  झालेल्या जीवित हानीबद्दल आणि नुकसानाबद्दल पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. उत्तर प्रदेशातल्या काही भागात वीज कोसळून प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधीतून 2 लाख रुपयांची तर जखमींना  50,000 रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.