Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटकातील बंगळुरू येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्ली, 29 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बंगळूरू येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली असून या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतित लवकरात लवकर सुधारणा होवोत अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली आहे.

एक्सवरील पोस्टमध्ये पंतप्रधान लिहितात:

“कर्नाटकातील बंगळूरू येथील भिंत कोसळल्याची घटना दुर्दैवी आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे होवोत.

पीएमएनआरएफमधूनन मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल: पंतप्रधान”

 

* * *

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai