Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई येथे गंगा द्रुतगती मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी केलेल्या संबोधनाची क्षणचित्रे केली सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई येथे गंगा द्रुतगती मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी केलेल्या संबोधनाची क्षणचित्रे केली सामायिक


नवी दिल्‍ली, 29 एप्रिल 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, उत्तरप्रदेशात हरदोई येथे गंगा द्रुतगती मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी केलेल्या संबोधनाची क्षणचित्रे आज सामायिक केली. राज्याच्या परिवर्तनकारी प्रवासाला अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नवीन उत्तर प्रदेशला परिभाषित करणाऱ्या पायभूत विकासाची अभूतपूर्व गती आणि औद्योगिक प्रगतीचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:

डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळात पायाभरणी नंतर निश्चित कालावधीच्या आत लोकार्पण करण्याचा संकल्प देखील पूर्ण होत आहे. त्यामुळेच आज उत्तर प्रदेशच्या द्रुतगती महामार्गापेक्षाही तेथील विकासाची गती अधिक आहे.

गंगा द्रुतगती महामार्ग केवळ एक जलदगती मार्ग नाही तर अनेक शक्यता आणि संधींचा महामार्ग आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बंधुभगिनींना मोठा लाभ होणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासासाठी आणि या राज्याला उत्पादन केंद्र म्हणून नावारुपाला आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. याची एक नव्हे तर अनेक उदाहरणे आहेत. 

 

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai