Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


नवी दिल्‍ली, 31 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती त्यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे तसेच जखमी तत्काळ बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची सानुग्रह मदत मोदी यांनी जाहीर केली आहे.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे: 

उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले आहे. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबियांसोबत आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना .

प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल : PM @narendramodi

 

* * *

आशिष सांगळे/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai