पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
पंतप्रधानांनी आज ताश्कंदमधील लालबहादूर शास्त्री स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधानांचे 1965 मध्ये ताश्कंद येथे निधन झाले होते. त्यांचे हे 60 वे स्मृतिवर्ष आहे. हे स्मारक लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्यात आलेल्या रस्त्यावर आहे. माजी पंतप्रधानांचे जीवन आणि वारसा ताश्कंदमध्ये प्रेमाने स्मरणात ठेवला जातो. या स्मारकाव्यतिरिक्त आणि रस्त्याव्यतिरिक्त ताश्कंदमध्ये एक स्थानिक शाळा आणि भारतीय सांस्कृतिक केंद्र देखील लालबहादूर शास्त्री यांच्या नावावर आहे.
शास्त्री स्मारकावर आदरयुक्त श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधानांनी ताश्कंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजला भेट दिली. विद्यापीठात पंतप्रधानांचे स्वागत उझबेकिस्तानचे पंतप्रधान आणि कुलगुरूंनी केले. विद्यापीठाच्या महात्मा गांधी केंद्रात शैक्षणिक आवड जपणाऱ्या भारततज्ज्ञ आणि विद्वानांशी त्यांनी संवाद साधला. या विद्यापीठाचा हिंदी भाषा आणि इतर भारतीय विषय शिकवण्याचा प्रभावी इतिहास आहे. त्यांच्या या शासकीय दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेकरिता लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती जाहीर केली. या विद्यापीठात हिंदी शिकवण्याचे हे 80 वे वर्ष आहे. दोन्ही देशांमधील घनिष्ठ सांस्कृतिक संबंध पाहता, उझबेक विद्यार्थ्यांमध्ये हिंदी शिकण्याची उल्लेखनीय उत्सुकता आहे. उझबेक आणि हिंदी भाषांमध्ये 3000 पेक्षा जास्त शब्द समान आहेत.
* * *
शैलेश पाटील/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai