Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुद्ध पौर्णिमनिमित्त सर्व नागरिकांना आपल्या शुभेच्छा दिल्या. भगवान बुद्धाच्या आदर्शांची पूर्तता करण्याबाबतची दृढ बांधिलकी अधोरेखित करत, पंतप्रधानांनी आशा व्यक्त केली की त्यांच्या विचारांमुळे समाजात आनंद आणि ऐक्याची भावना अधिक दृढ होईल. त्यांनी पुढे सर्वांना आवाहन केले की, शांतता, करुणा आणि सद्भावना यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र प्रसंगी भगवान बुद्धांच्या जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करूया.

यावरचे एक संस्कृत सुभाषित सादर करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, गौतम बुद्धाच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती हे समजते की अंतर्गत किंवा बाह्य असे कोणतेही कायमस्वरूपी स्वतंत्र अस्तित्व नाही आणि ती  सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प आणि सम्यक आचरण या अष्टांगिक मार्गाचे पालन करते,तेव्हा ती दुःखातून मुक्त होते आणि परम शांतता प्राप्त करते.

X वरील संदेशाच्या मालिकेत पंतप्रधानांनी लिहिले:

“बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा. भगवान बुद्धांच्या आदर्शांची पूर्तता करण्याबाबतची आपली बांधिलकी अत्यंत दृढ आहे. त्यांच्या विचारांमुळे आपल्या समाजात आनंद आणि ऐक्याची भावना अधिक दृढ होवो.”

सर्व देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. शांतता, करुणा आणि सद्भावनेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र प्रसंगी, चला आपण भगवान बुद्धाच्या जीवनमूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प पुन्हा दृढ करूया.

नान्तर्बहिश्च लोकेषु त्वात्मानं दृष्टवान् क्वचित्।
आष्टाङ्गिकेन मार्गेण परमां शान्तिमाययौ॥”

गौतम बुद्धाच्या मते, जेव्हा एखादी व्यक्ती हे समजते की अंतर्गत किंवा बाह्य असे कोणतेही कायमस्वरूपी स्वतंत्र अस्तित्व नाही आणि ती  सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प आणि सम्यक आचरण या  अष्टांगिक मार्गाचे पालन करते तेव्हा ती दुःखातून मुक्त होते आणि परम शांतता प्राप्त करते.

***

हर्षल अकुडे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai