पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026
कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एप्रिल 2025 मध्ये त्यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान, हे पूजनीय अवशेष श्रीलंकेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता,जेणेकरून लोकांना आदरांजली वाहण्याची संधी मिळेल,याचे पंतप्रधानांनी स्मरण केले.
शतकानुशतकांचा सामायिक वारसा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांनी भारत आणि श्रीलंका हे एकमेकांसोबत गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधांनी बांधले गेलेले आहेत, यावर मोदी यांनी भर दिला. श्रीलंकेत पवित्र देवनिमोरी अवशेषांचे आगमन हे दोन्ही राष्ट्रांमधील शाश्वत आध्यात्मिक बंधाचे प्रतीक आहे, असे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
भगवान बुद्धांचा करुणा, शांती आणि सौहार्दाचा कालातीत संदेश मानवतेला मार्गदर्शन करत राहील, सीमा ओलांडून एकता आणि समंजसपणा वर्धिष्णु करत राहील अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
आपल्या विविध एक्स पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
“कोलंबो येथील पवित्र गंगारामया मंदिरात पवित्र देवनिमोरी अवशेष दर्शनार्थ खुले केल्याबद्दल राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांचे आभार”.
एप्रिल 2025 मध्ये माझ्या भेटीदरम्यान, हे अवशेष श्रीलंकेत आणण्याचे ठरले होते, ज्यामुळे लोकांना आदरांजली वाहण्याची संधी मिळेल. आपण दोन्ही राष्ट्रे गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधांनी जोडलेले आहोत. भगवान बुद्धांचा करुणा, शांती आणि सौहार्दाचा कालातीत संदेश मानवतेला मार्गदर्शन करत राहो.
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2222243®=3&lang=1”
Gratitude to President Anura Kumara Dissanayake for inaugurating the Exposition of the Holy Devnimori Relics at the sacred Gangaramaya Temple in Colombo.
During my visit in April 2025, it was decided these relics will come to Sri Lanka, thus giving the opportunity for the… https://t.co/rLGTRudlsZ
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
नेहा कुलकर्णी /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Gratitude to President Anura Kumara Dissanayake for inaugurating the Exposition of the Holy Devnimori Relics at the sacred Gangaramaya Temple in Colombo.
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
During my visit in April 2025, it was decided these relics will come to Sri Lanka, thus giving the opportunity for the… https://t.co/rLGTRudlsZ
කොළඹ, ගංගාරාම විහාරස්ථානයේ දී පූජනීය දෙව්නිමෝරි ධාතු ප්රදර්ශනය විවෘත කිරීම සම්බන්ධයෙන් ජනාධිපති අනුර කුමාර දිසානායක මැතිතුමාට කෘතඥතාවය පළ කරමි.
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
මාගේ 2025 අප්රේල් සංචාරය අතරතුරදී මෙම ධාතුන් වහන්සේලා ශ්රී ලංකාවට වැඩම කරවන බවට තීරණය කරන ලද අතර ඒ අනුව ජනතාවට ධාතුන් වහන්සේලා… https://t.co/rLGTRudlsZ
கொழும்பிலுள்ள புனித கங்காராமை விகாரையில் புனித தேவ்னிமோரி சின்னங்களின் தரிசனத்தை ஆரம்பித்துவைத்தமைக்காக ஜனாதிபதி அநுர குமார திசாநாயக்க அவர்களுக்கு நன்றி.
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2026
2025 ஏப்ரலில் எனது விஜயத்தின்போது இச்சின்னங்களை இலங்கைக்கு அனுப்புவது குறித்து தீர்மானிக்கப்பட்டதுடன் அதன் அடிப்படையில்… https://t.co/rLGTRudlsZ