Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्रिपुराच्या प्रगतीस चालना देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी तसेच विविध सामाजिक कार्यांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीसाठी ते कायम स्मरणात राहतील, असे मोदी यांनी म्हटले आहे.

एक्स वर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,  

“त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. त्रिपुराच्या प्रगतीस चालना देण्याकरता त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी तसेच विविध सामाजिक कार्यांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीसाठी ते कायम स्मरणात राहतील. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

 

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे